Author Topic: माझी गाणी :हुरहूर  (Read 609 times)

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
माझी गाणी :हुरहूर
« on: March 08, 2012, 08:25:52 PM »
हुरहूर

धुंद त्या गोड स्मृती ठेवुनी मजपाशी
सजणा तू का रे निघूनी गेलास दूरदेशी

भेट तुझी माझी झालीच  नसती तर
वाटली नसती मनास उगाच ही हुरहूर
मन माझे रातदिन घुटमळते तुजपाशी


नाही सहन होत विरह हा आता मजला
अगतिक झाली  काया बिलगण्या तव तनुला
लवकरी येउनी, मज तुज्या बाहूत घेशी

सांग नाहीतर विसरुनी जा ती प्रीत
वचने ती खोटी दिली क्षणिक प्रणयात
धरणार मी हि नाही आशा खुळी उराशी
सजणा तू का रे निघूनी गेलास दूरदेशी

--प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझी गाणी :हुरहूर
« Reply #1 on: March 09, 2012, 10:25:34 AM »
nice...

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: माझी गाणी :हुरहूर
« Reply #2 on: March 09, 2012, 11:42:20 AM »
Very nice :)