Author Topic: गर्द त्या राईत..  (Read 900 times)

Ajadhav334@gmail.com

  • Guest
गर्द त्या राईत..
« on: March 19, 2012, 12:43:24 PM »
गर्द त्या राईत..
मन अधिकच गर्द होत असे..
काही क्षण ते आमचे
सोबत घालवलेले आठवून...
 
गर्द त्या आठवणीचे..
सारेच हिशोब तिने जाताना
आपल्या डोळ्यात माळून
निघून गेली...
 
कळवळा वाटतो कधी कधी
माझा त्या गर्द राईला आता..
एक झुळुक कशीबशी देते ती मला..
त्या मोगर्‍याचा
त्या तिच्या धुंद अश्या सुवासाचा
जेव्हा ती यायची..
गजरा माळून केसात आपूल्या...

 
उरलेला आता फक्त...
तो गजरा त्याचा सुवास
तो मोगरा
शीतल एक ती
झुळुक वार्‍याची...
 
कायमची आता
गर्द माझ्या त्या
भावनाशून्य मनात...
 
आदित्य अ. जाधव...!!!

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline utkarsh

  • Newbie
  • *
  • Posts: 23
Re: गर्द त्या राईत..
« Reply #1 on: March 19, 2012, 12:59:51 PM »
chan...

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: गर्द त्या राईत..
« Reply #2 on: March 20, 2012, 12:19:04 PM »
good