Author Topic: एकदा तरी वळुन बघायचंस जाताना....  (Read 2539 times)

Offline Ashwini patil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Female
तुझ्याशिवाय जगताना,
जगताना काय मरताना,
त्या रखरखत्या उन्हात तळपताना,
त्या विरहाच्या आगीत जळताना,
एकदा तरी वळुन बघायचंस जाताना....

गर्दीत सुद्धा एकटी असताना,
तुझ्या सावली सोबत बोलताना,
तु नसताना तुझ्यावर प्रेम करताना,
तुझ्या आठवणीत स्वतःला विसरताना,
एकदा तरी वळुन बघायचंस जाताना....

या वाटेवर अडखळताना,
तुला शोधण्यासाठी इकडे तिकडे पळताना,
आणि नाही सापडलास कि सावरताना,
स्वतःचं मनाची समजुत काढताना,
एकदा तरी वळुन बघायचंस जाताना....

आता निरोप देते ञासांना,
आता तोडते स्वप्नांना,
आता तोडते त्या नाजुक बंधांना,
आणि आता मुक्त करते श्वासांना,
आता एकदा तरी बघ मला जाताना....

By- Ashwini Patil.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pratikk

 • Newbie
 • *
 • Posts: 21
 • Gender: Male
 • ...
खुप छान कविता केलीस तु अश्विनि। खरच अगदी काळजाला भीङलीस तु। खुप खुप खुप खुप छान.

Offline Ashwini patil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Female
pratik thank u very much...... :)

Offline kiran4_u

 • Newbie
 • *
 • Posts: 12
अश्विनीजी,  आपण खूपच छान लिहिता  आपली कविता वाचताना  वाटते कि आपण माज्याच  मनातले बोलत आहात  मला शब्दात मांडता येत नाही आपण खूपच सुरेख लिहिता  थेट काळजाला भिडते    किरण 

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
अप्रतिम कविता...
तुम्ही छान शब्दांची मांडणी केली आहे त्याच प्रकारे सुरेख व सोपे शाब्दिक अर्थ समोर ठेवले आहेत ..
अप्रतिम......! :) [size=78%]  [/size]

Offline Ashwini patil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Female
KALPESH NAD KIRAN THANK YOU VERY MUCH.....   :)

amita,pune

 • Guest
रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS

*कविता SMS

*चारोळ्या SMS

*BEAUTY टिप्स

*LOVE टिप्स

*पुणेरी विनोद

*ग्राफिटी SMS

*सुविचार आणि
*उखाणे


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>Prem_Geet

आणि पाठवा
९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..
किंवा

या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे