Author Topic: प्रीतीचे गीत मी गाऊ कसा ?  (Read 813 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
प्रीतीचे गीत मी गाऊ कसा ?

प्रिये तुजवीण राहू कसा ?
प्रीतीचे गीत मी गाऊ कसा ?

येई संध्या तीच दिवाणी
नसे तुझी छटाही राणी
रेतीत पाऊलखुणा तुझ्या कश्या ?
प्रीतीचे गीत मी ..........................

नसती सूर्य, चंद्र, तारे
उदास गाणे गाती वारे
मनातल्या लाटांना थोपवू कसा ?
प्रीतीचे गीत मी .........................

वाहू लागले ,ग , पहाट वारे
गंध न तुझे ,न,तुझे इशारे
स्वप्नात सखे ,असा जगू कसा ?
प्रीतीचे गीत मी .......................

__विनय काळीकर ___

Marathi Kavita : मराठी कविता


Offline balrambhosle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
Re: प्रीतीचे गीत मी गाऊ कसा ?
« Reply #1 on: April 19, 2012, 07:28:58 PM »
sundar ahe..ani sur lawnyasarkhi ahe....