Author Topic: का रे निघून गेलास तू ..??  (Read 1558 times)

का रे निघून गेलास तू ..??
« on: May 06, 2012, 10:41:54 PM »

का रे  निघून गेलास तू ..??


काय असतं  हे प्रेम  समजायच्या आधीच तू  गेलास  रे
काय असतं  मधुमिलन  रात्र  पहायच्या आधीच  तू  गेलास रे
जागते स्वप्न  पूर्ण होण्याआधीच  तू गेलास  रे ....!!

काय  नशीब  होते  जे  ऐसे  जगणे आले
पतीविनाचे जगणे हे माझ्याच  भोगी आले
तुझे प्रेम मिळण्य आधीच  निघून  गेलास तू ..!!

आकाशात   उंच  उडण्या आधीच पंख तोडून गेलास तू
सागरात ह्या कागदी नावेत बसुनी एकटे
वादळात सोडून गेलास  तू ....!!

कसे  जगू रे मी तुजवीण
डोळ्यांत अश्रू अन विरह देऊन गेलास तू
काय असता  प्रेम  कळण्याआधीच गेलास तू ,,,!!

येना रे   मला नको ऐसे  सोडू
मला  काय  हे लोक म्हणतात बघ ना  रे
विधवेचा तिला  लाऊन कुंकू बघ  रे पुसतात  ....!!

बांगड्या वाजायच्या आधीच गेलास तू
नथनी हि  उतरण्य आधीच  गेलास  तू
नटणे-सजणे काय असतं
तुझ्यासाठी सजन्या आधीच निघून गेलास तू ....!!

आयुष्यभर एकटे  राहू मी 
का रे एवढे दुख देऊन गेलास तू ....!!
-
       •*´¨`*•.¸¸.•*´¨`*•
°*”˜˜”© प्रशांत शिंदे..•°*”˜˜”
       •*´¨`*•.¸¸.•*´¨`*•

Marathi Kavita : मराठी कविता