Author Topic: आज तिने नक्की गजरा माळला असेल  (Read 1774 times)

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
आज  त्याचा  वाढदिवस,
आज तिच्या  लग्नाला  सुद्धा एक महिना  पूर्ण झाला.
ती  दुख्खाचा  आनंद साजरा  करेल  कि............. आनंदाचे  दुख्ख
 
 
आज  तिने  नक्की  गजरा  माळला असेल,
माझ्यासाठी  एकतरी  अश्रू  ढाळला असेल.
जाताना  सांगून  गेली  होती  कि  विसर म्हणून,
आज  आठवणींचा  अल्बम  नक्की  चाळला असेल.
वेड्यासारखी समजावत होती कि खुश राहीन,
आजचा  दिवस  तिने  मौनाचा  पाळला असेल.
एव्हाना  तो यायची वेळ  झाली  असेल,
भिजलेला  रुमालही आता वाळला असेल.
आज एक  अनोळखी मुका  फोन  आला  होता,
माझा  उदासीन  आवाज  तिला  कळला असेल.
वेडीला  कळत होतं कि विसरणं  कठीण आहे,
जाताना  तिचाही  जीव  तितकाच पोळला असेल.
आज  तिने  गोड धोड नक्की  केलं असेल घरात,
गोडधोडाचा  विषय  सांगायला  टाळला असेल.
तो  बाहेर गेल्यावर तीच  साडी नेसली  असेल,
आणि आज  तिने  नक्की  गजरा  माळला असेल.
 
 
  ..........अमोल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Awesome !!!!!!!!! :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
hmmm.....

Offline praveen.rachatwar

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
khupcha chaan rachana keli... wah


kuldip Ghatge

 • Guest
 :)1 ch number 

prasad palande

 • Guest