Author Topic: वाट तुझी पाहताना  (Read 2046 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
वाट तुझी पाहताना
« on: May 31, 2012, 11:15:16 AM »
चांदण्या मोजताना
कित्तीदा चुकायचं,
वाट तुझी पाहताना
आणिक काय करायचं.

वाऱ्यांनी वाहताना
ताऱ्यांनी डोलायचं ,
वारयासंग असं
कित्ती कित्ती झुलायच.

उन मी म्हणताना
कासावीस होऊन जायचं ,
पहिल्या वहिल्या थेंबासाठी
चातक होऊन जायचं .

समुद्रात दिशांना
दिसतो दीपस्तंभ
आशेच्या एका किरणासाठी
कुठेशी बघायचं .

.____विनय काळीकर___
____नागपूर________

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: वाट तुझी पाहताना
« Reply #1 on: June 05, 2012, 10:32:11 AM »
Khup Sundar  :)