Author Topic: सख्या सवय झाली आहे  (Read 1549 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
सख्या सवय झाली आहे
« on: June 16, 2012, 07:45:09 PM »

उशीरा येण्याची आता तुझ्या,
सख्या सवय झाली आहे
तरी टेबलावर जेवण
अन दारावर डोळे ठेवून
मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे

अश्यातच ... आयुष्याच्या पानावरती
नव्यानेच लिहिलेले काही क्षण
मन पटलावर पुन्हा एकदा
थैमान घालू लागले..

अन विचारांच्या वादळात
अनेक अनुत्तरीत प्रश्न
पुन्हा एकदा ह्रदयाच्या दारावर
अस्त व्यस्त पणे धडकू लागले

का रे सख्या असा करतोस ?
माझाच असताना तू
प्रेम विसरुन फ़क्त क्षणीक सुखांसाठी
मज अवेळी बिलगतोस

रात्र तुझी , माझे सर्वस्व ही तुझेच
पण फ़क्त शरीरा साठीच
तुझे काही क्षण मजपाशी असणे
मला आता बोचते रे

तरी या स्त्रीचे हे विडंबन
सहन करीत मी
तोंडावर ताबा अन
दारावर डोळे ठेवून
पुन्हा तुझीच वाट पहात आहे
पुन्हा तुझीच वाट पहात आहे..

----- शब्दमेघ.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: सख्या सवय झाली आहे
« Reply #1 on: June 18, 2012, 01:05:39 PM »
chan kavita.... komal bhavana...