Author Topic: तो एकच शब्द अन ती एकच वाट..  (Read 1810 times)

Offline mylife777

  • Newbie
  • *
  • Posts: 33
  • Gender: Male
  • 'यारो इतना शक ना करो, इश्क के दौर से गुजर रहे है !
तो एकच शब्द अन ती एकच वाट..
तो अन ती दोघेही एकच वाटेवर चालले होते.. एकटेच..
त्याने तिला साद घातली अन म्हणाला,
चालशील का या वाटेवर माझ्यासोबत..
ती म्हणाली का रे??
ठीक आहे चालते मी तुझ्या सोबत..
चालता चालता त्याने तिची विचारपूस केली,
तिनेही कळत- नकळत त्यांची उत्तरेही दिली.
दोघेही मन मोकळेपणाने गप्पा मारत ते अंतर कापू लागले...
का कुणास ठाऊक ???
दोघांच्याही मनात आंतरिक ओढ निर्माण होऊ लागली...
याची तिला चाहूल होताच ती गप्प राहू लागली...
तिला गप्प राहण्याचे कारण विचारताच ती काही नाही अस म्हणाली,
अन अचानक तिने त्याला विचारल,
" आज जशी या वाटेवर तू मला साथ दिली तशीच या जीवनातही देशील का ???"
तिच्या या प्रश्नावर त्यानेही तिला प्रश्न विचारला,
" या वाटेवर तू मला किती दिवस साथ देशील??"
हा प्रश्न जणू काही त्याच्या मनाने विचारला होता...
तिचे उत्तर काय असाव??
"शेवटच्या स्वासपर्यंत"..
अन तिचे अपेक्षित असलेले उत्तर त्याला मिळाल होत..
तो म्हणाला मीही तुला या जीवनात साथ देईन..
आणि मग काय...
तिने या वाटेवर चालायला सुरवात तर केली,
पण..... पण......
दोन पावले चालतच... तिचा हात सुटला...
अन ती काहीच न बोलताच गायब झाली...
पण अजूनही तो तिथेच उभा आहे...
तिच्या त्या एक शब्दावर अन त्या वाटेवर.. तिची वाट बघत...
येईल ती कधीतरी ... पण कधी ??? हेच माहित नाही...

Author- Unknown