Author Topic: येते का तुला, आठवण माझी  (Read 2577 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
कधी रिमझिम पाऊस पडताना
तर कधी मंद वारा गीत गाताना
येते का तुला, आठवण माझी

कधी प्रेमगीत ऐकताना
तर कधी एकटीच तू असताना
येते का तुला, आठवण माझी

सायंकाळचा सूर्यास्त होताना
नभात रात्री चांदणे लुकलुकताना
येते का तुला, आठवण माझी

                              -आशापुत्र

do visit www.prashu-mypoems.blogspot.com

Marathi Kavita : मराठी कविता