Author Topic: फसवे डाव..  (Read 1410 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
फसवे डाव..
« on: June 27, 2012, 03:14:09 PM »
खरंच इतकं अवघड गेलं का गं
तूच निवडलेल्या रस्त्यावरून चालताना..
तुम्ही लोकं ना.. विचारच करत नाहीत
तुम्हाला काय हवंय ते..
बाकी हट्टानं पेटणं पुरेपूर कळतं..
कशासाठी ते मात्र राहूच द्या..
दिसतीये.. तुझी ओढाताण
तूच निवडलेल्या मार्गावरची..
मी नाही मदतीला येणार आता
आणि विचारणारही नाही
काही दुखतंय.. खुपतंय..
आणि तुही सांगणार नाहीस
सांगशील ती तू कसली मग!
चालुदे.. वेडे खेळ.. आंधळे डाव..
मुभा असेल तुला.. माझ्या कालच्या राज्याची..
चालू देत फसवे निशाने.. रुसवी कडी
शेवटी हा तुझाच डाव.. अन तुझाच गडी

- रोहित
« Last Edit: June 27, 2012, 04:31:58 PM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता