Author Topic: तुझी आठवण  (Read 2121 times)

Offline Pratikk

  • Newbie
  • *
  • Posts: 21
  • Gender: Male
  • ...
तुझी आठवण
« on: July 05, 2012, 10:38:48 AM »
वाऱ्‍याची मंद झुळूक गारवा देऊन जाते,
स्पर्श करुन मला तुझ्या स्पर्शाची जाणिव करून देते ।

पावसाची बेधूंद सर
चिँब भिजवून जाते,
भिजलो होतो कधी तुझ्या मिठीत,
त्या मिठीची आठवण करून देते ।

रात्रीचा तो चंद्र मला सारखा पाहत राहतो,
हातात हात घालून कधी त्याच्या छायेत फिरायचो,
त्या रस्त्यांची आठवण करून देतो ।

एकांतात असताना अचानक कुणीतरी विचारतो,
"कायरे एकटाच बसलाय?"
त्याचा हा प्रश्न मी गेल्या ७ वर्षांपासून एकांतात असल्याची आठवण करून देतो ।।।

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझी आठवण
« Reply #1 on: July 06, 2012, 10:02:27 AM »
hmmmm :(