Author Topic: आठवांचे वादळ  (Read 1052 times)

Offline joshi.vighnesh

  • Newbie
  • *
  • Posts: 34
आठवांचे वादळ
« on: July 22, 2012, 01:16:50 PM »
नयन बोलती कथा सांगति
ते मनी भाव अंतरी दावती
काहुर मनी चंचळ भासती
विचार ते लपंडाव खेळती

कुणास जिंकण्या कुणि सांगावे
कुणास सांगण्या भेद स्मरावे
स्मरुनी गेले उरुनी राहावे
अंतरात तव वादळ यावे

कितीदा वादळ येवुनी गेले
आठवांच्या धुळीत वाहीले
पुन्हा पाचोळा जमवुनी जुना
मी वादळाशी झुंजत आले..

विघ्नेश जोशी...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आठवांचे वादळ
« Reply #1 on: July 23, 2012, 12:07:15 PM »
chan kavita