Author Topic: तुझ्या मिलनाची आस  (Read 1158 times)

Offline Jai dait

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
तुझ्या मिलनाची आस
« on: July 23, 2012, 02:12:45 PM »
तुझ्या मिलनाची आस..
त्यांच्या इतकीच खास
जशी क्षितिजाच्या येथे
धरती आणि आकाश

तुझ्या मिलनाची आस..
त्यातच मन उदास
डोळ्यांतून वाहे पाणी
नि चेह-यावर हासं

तुझ्या मिलनाची आस..
सोडवते सारे त्रास
काय नि किती सांगावे
सारे जातसी अस्तास

तुझ्या मिलनाची आस..
बस जगण्याचा भास
तूच यावं नि स्पर्शाव
मोकळा होऊ दे श्वास...

Marathi Kavita : मराठी कविता