Author Topic: प्रेमाचा विरह....  (Read 2212 times)

Offline vaishnavirajeev

  • Newbie
  • *
  • Posts: 27
प्रेमाचा विरह....
« on: July 31, 2012, 06:27:43 PM »
कळत नकळत तो तिच्या आयुष्यात आला...
मित्र म्हणता म्हणता तीच आयुष्यच होऊन गेला
त्याला नेहमी हसत पाहायचे होते
त्याच्यासाठी तिला काही खास करायचे होते..
पण
आता त्याच्या साठी तीच खास होत होती
मने एकमेकांची आता जुळत होती
स्वप्न पाहायला दोघेही थकायचे नाही
एकत्र राहायची दोघे स्वप्न पाही..

तासनतास बोलूनही गप्पा संपत नव्हत्या
एकमेकांचा सहवास हवाहावसा वाटत होता
सुखात दुखत नेहमी सोबत राहायचे
भेटण्यासाठी नेहमी कारण शोधायचे

मग अचानक एकदा त्याला आठवण झाली
आई बाबाची काळजी वाटली
मान्य होणार नव्हते ते लग्नाला..
"मला विसरून जा"अस तो तिला म्हणाला

हसावे की रडावे तिला काही सुचत नव्हते
समजवावे त्याला तर...शब्दच काही फुटत नव्हते
मला सुखी पाहायचे असेल तर तुला एवढे करावे लागेल
माज्या आठवणी सोबतच कदाचित तुला जगावे लागेल...

ती स्तब्ध उभी होती...पाहत त्याच्या कडे
तो मात्र ठाम होता..त्याचा निर्णयांमधे
आजही ती त्याच्यासाठी खूप रडते
आणि
त्याच्या आठवणीत जगण्याचा प्रयत्नही खूप करते....

vaishnavi kulsange

Marathi Kavita : मराठी कविता


Preetiii

  • Guest
Re: प्रेमाचा विरह....
« Reply #1 on: August 01, 2012, 03:33:47 PM »
काय लिहावं ते कळत नाही. माझी हीच परिस्थिती आहे.