Author Topic: आता तुझा एक हि शब्द कानी पडत नाही..  (Read 1400 times)

आता तुझा  एक हि शब्द  कानी पडत नाही
 
 जो आवाज  तेव्हा  सतत सोबत असायचा
 
 आता तोच आवाज  जराही  जाणवत नाही
 
 जे   ओठ कधी माझे नाव घ्यायचे 
 
 माझ्या समोर  येताच  गालातल्या गालात हसायचे
 
 ते हास्य आता कुठेच  दिसत नाही
 
 वाट पाहत  मी  चंद्र सोबत रात्रभर  जागतो
 
 पहाट होताच  तो  चंद्रही  निघून जातो
 
 पण मन माझे  तसेच वाटेवरच थांबते
 
 जिथे  तुझे  येणे आता शक्य  नसते
 -
 © प्रशांत शिंदे