Author Topic: सखी ती माझी  (Read 1117 times)

Offline avi10051996

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
सखी ती माझी
« on: August 22, 2012, 10:14:54 PM »
..............आग्रही आजही ते जाणून मज घेण्या
मित्र राहुनी करती प्रश्नांवर प्रश्न पुन्हा पुन्हा

कारे ....एव्हडे कष्ट घेऊनही काय मिळाले तुला
आजही बांधतोसच ना तिच्या वाटेवर श्रावनझुला ?
येतेकारे ....आजही तिची आठवण तुला
का होता फक्त तिजसम तुझा नयनखुला ?
दाखव नारे ...फोटो एखादा हृदयाजवळ तुझ्या
का मिरवतोस फक्त सावलीचा नाद्खुला ?

ऐकून डोकावले ....पुन्हा मनी खोलवर
निवांत झालो ऐकता श्वास तिचा क्षणभर
मान्हालो मित्रा आठवायला तिला विसरावे तर लागेल
पण विसरता कधी आलेच नाही हेही आठवावे का लागेल
फोटो कशाला हवाय हृदयाजवली
हृदय माझे तिचीच छबी...डोळे मिटता तीच दारी

सांग नारे...नाव काही नात्यापरी,नको अनोळखी ठेऊ
तुजसम नाही कोणी लावला जीव हे तिला पटवून देऊ

नको मित्रा....नात्याला नाव लाऊ ....सखी ती माझी
जीवनभर सोबत देतो पण नात्यात तिला नको गुंतवू
« Last Edit: August 22, 2012, 10:45:26 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sandesh More

  • Newbie
  • *
  • Posts: 18
  • Gender: Male
  • Sandy
Re: सखी ती माझी
« Reply #1 on: August 24, 2012, 10:13:46 AM »
वा सुंदर