Author Topic: ........... विरहाच्या ऋतूत नेहमी  (Read 1209 times)

Offline avi10051996

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
..........व्हावा तिलाही विरहदाह कधीतरी
आठवावा व्याकूळ नयनांचा ठाव कधीतरी

पहावी तिनेही हतबल मनाची व्याप्ती कधीतरी
करावी तिनेही नकोश्या आठवणींशी शय्या कधीतरी 
नव्हतेच हृदय तिला.... आहे का ती निर्दयी कसे उमजेल
कोणासाठी का कधी डोळे तिचे आठवण येता पाणावेल

रोज रात्री जागरण करताना...पांघरूण घेऊन अश्रू ढळताना
जाणवेल का तिला कोणी तरी आहे तीजसम सद्दैव जळताना   
प्रयत्न करेल सावरण्याचा..कि विसरेल तो भाग आठवणीचा
उमजेल दु:खाची परिभाषा..कि करेल काळ साठवणींचा 

कळू दे तिलाही नाही जगता येत विरहाच्या ऋतूत नेहमी
धरू दे कास तिलाही या एकाकी जगाची..थिजलेल्या मनाची 
ज्या एकांताला ..एकही दिवस नाही...कि.....एकही रात्र नाही