Author Topic: जीवन जगतो तुझ्याविन…  (Read 1716 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
जीवन जगतो तुझ्याविन…
« on: September 11, 2012, 08:12:01 PM »
ही कविता चित्रकविता पहायची असेल तर येथे क्लीच्क करा ..
[/size]]http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_11.html

जीवन जगतो तुझ्याविन… 

जीवन जगतो तुझ्याविन  एकला एकाकी दुःखात
रात्र परि उडून जाते स्वप्नीं तुला पाहण्यात ।
श्वासासंगे आठवण येते  तुझ्या हृदय स्पंदनाची
हळूंवार ही झुळूक संगे  तुझ्या कोमल स्पर्शाची ।
कंठातून ते शब्द निघतां  नांव तुझे ओठीं येते
कानीं अन स्वर ते पडतां  तूं मारली हांक ऐकू येते ।
वेळी अवेळी भास होतो  तुझ्या प्रेमळ सान्निध्याचा
आवरतो न मोह मजला  कवटाळून तुज घेण्याचा ।
अचानक उठतो हात माझा  हांत तुझा धरण्यासाठी
आतुरतेने अन मन माझे  तुझ्या मादक स्पर्शासाठी ।
राहतो परि हात नुसता  हवेंत तो वरच्या वरती
अनामिक अन दडपण  येते  दुखावल्या मम मनावरती ।
क्षणांत आठवते  माझे मला  साथ सोडली तू अचानक
आणि घालवितो पुढचे  दुःखांत क्षण एक एक ।
आतां फक्त आठवणीवर  उरले जीवन जगायचे
अन एकाकी जगून  मातीत मिळून जायचे  ।।                                           

 रविंद्र बेंद्रे

Marathi Kavita : मराठी कविता