Author Topic: तू जाताना .....  (Read 2688 times)

Offline atulmbhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 48
तू जाताना .....
« on: September 12, 2012, 05:23:39 AM »
तू जाताना
 तू जाताना दिशा बुडाल्या गरगर वेडी धरा
दो डोळ्यांचा आपसूक झाला पाझरणारा झरा

तू जाताना गळले पाउल नको नकोसे जिणे
आभाळ भरले चंद्र, तारका तरी चांदणे सुने

तू जाताना पाऊलवाटा काजळ-काळ्याभोर
डोळ्यांपुढती दिसू लागतो  बिनपंखांचा  मोर

तू जाताना हसले काटे, गुलाब झाले मुके
मीच एकला अवती भवती दाट जाहले धुके

तू जाताना मुकी जाहली खुळ्या कवीची वही
घेऊन जा तू तुझीच- माझ्या हृदयावरची सही

सांग सखे गं बुजेल का हा हृदयावरचा चरा ?
आटेल का अन मज डोळ्यांचा पाझरणारा झरा?

तू जाताना वादळवारे तुफान आले घरा
बघ आभाळी धूळ माखल्या हवेत- माझा चुरा
     बघ आभाळी धूळ माखल्या हवेत -माझा चुरा ......
          तू जाताना... तू जाताना...... तू जाताना............

                                   अतुल भोसले 
« Last Edit: September 13, 2012, 12:58:01 AM by atulmbhosale »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तू जाताना .....
« Reply #1 on: September 12, 2012, 10:50:24 AM »
ekdam mast kavita..... chaan gaane.

Offline atulmbhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 48
Re: तू जाताना .....
« Reply #2 on: September 13, 2012, 01:22:58 AM »
केदार   
मनापासून  धन्यवाद .

sachin7305

 • Guest
Re: तू जाताना .....
« Reply #3 on: September 15, 2012, 10:50:18 PM »
तू जाताना
 तू जाताना दिशा बुडाल्या गरगर वेडी धरा
दो डोळ्यांचा आपसूक झाला पाझरणारा झरा

तू जाताना गळले पाउल नको नकोसे जिणे
आभाळ भरले चंद्र, तारका तरी चांदणे सुने

तू जाताना पाऊलवाटा काजळ-काळ्याभोर
डोळ्यांपुढती दिसू लागतो  बिनपंखांचा  मोर

तू जाताना हसले काटे, गुलाब झाले मुके
मीच एकला अवती भवती दाट जाहले धुके

तू जाताना मुकी जाहली खुळ्या कवीची वही
घेऊन जा तू तुझीच- माझ्या हृदयावरची सही

सांग सखे गं बुजेल का हा हृदयावरचा चरा ?
आटेल का अन मज डोळ्यांचा पाझरणारा झरा?

तू जाताना वादळवारे तुफान आले घरा
बघ आभाळी धूळ माखल्या हवेत- माझा चुरा
     बघ आभाळी धूळ माखल्या हवेत -माझा चुरा ......
          तू जाताना... तू जाताना...... तू जाताना............