Author Topic: कुणा न कळे व्यथा ही ...  (Read 1747 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
कुणा न कळे व्यथा ही ...
« on: September 24, 2012, 10:06:07 PM »
.
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_24.html
कुणा न कळे व्यथा ही ...

कुणा न कळे व्यथा ही
माझ्या दुःखी जीवनाची
दूर जाऊनि मज सखीने
शिक्षा दिली विरहाची ।
दिन एकेक सरुनि जातो
माझ्या कष्टी विरहांत
आणि आता वास करते
घोर ते दुःख तिचे मनांत ।
क्षणाक्षणाला येई माझी
सखी माझ्या नेत्रांसमोरी
वास्तवतेत परि ती असे
माझ्या पासून दूरवरी ।
साहावा विरह कसा 
निष्प्रेम ह्या जीवनांत ।
विचार सारे खुरटले 
जबरदस्ती ह्या एकांतात ।।
      रविंद्र बेंद्रे
« Last Edit: September 24, 2012, 10:06:54 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता