Author Topic: ती येते अन मुद्दाम  (Read 1755 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
ती येते अन मुद्दाम
« on: September 26, 2012, 01:14:18 AM »
ती येते अन मुद्दाम
मला न भेटताच जाते
तिला कदाचित माझी
का स्वत;ची भिती वाटते

काय अजूनही डोळ्यातून
माझ्या प्रेम आहे झरते
का अजूनही तिला तिचा
नकार आहे दु:ख देते

खूप वर्ष झाली आता
सार विसरायला हवे ते
समजावया हवे तिला
की वय वेडे होते ते

तेव्हा तर तिला मी
सरळ विचारले होते
नकारातील अश्रूत तिच्या
अन प्रेम वेचले होते

नंतर पण व्रत मैत्रीचे
तरीही पाळले होते
आता ही व्रत माझ्या
मनात दृढ आहे ते

जाळला अंकुर प्रत्येक
प्रीतीची स्मृति तीही
भिती मग कसली तिला
कळेना मज अजूनही

तसे न भेटणे तिचे
स्वीकारले आहे जरी
जाणे तिचे असे परी
टोचते आहेच उरी

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ती येते अन मुद्दाम
« Reply #1 on: September 26, 2012, 10:53:01 AM »
नकाराच्या अश्रूंत तिच्या 
प्रेम वाचले होतेस जे   
न भेटता जाण्यात तिच्या 
नाही दिसत का तुला ते?   
 
जळाला प्रेमाचा अंकुर जरी
मूळ जळलेलं नसतं
मनाच्या खोल मातीत
प्रेम तग धरून असतं   
 
समजून घेशील  तिला
अन स्वीकारशील  ह्या निशब्द प्रेमाला
जाणे तिचे असे मग
टोचणार नाही जीवाला     
 
 
केदार... :)
« Last Edit: September 26, 2012, 10:53:46 AM by केदार मेहेंदळे »

Offline avi10051996

 • Newbie
 • *
 • Posts: 27
 • Gender: Male
Re: ती येते अन मुद्दाम
« Reply #2 on: September 27, 2012, 09:28:06 PM »
जळाला प्रेमाचा अंकुर जरी
मूळ जळलेलं नसतं
मनाच्या खोल मातीत
प्रेम तग धरून असतं    :) :) :)

.......केदारजी सही यार

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: ती येते अन मुद्दाम
« Reply #3 on: September 27, 2012, 10:20:22 PM »
पूर्वी गोष्टी खाली तात्पर्य असायचे ,तसे केदारने कवितेचे तात्पर्य लिहले आहे .

Heena

 • Guest
Re: ती येते अन मुद्दाम
« Reply #4 on: October 02, 2012, 12:12:15 AM »
Very nice