Author Topic: तू दिलेस वचन मला...  (Read 1538 times)

Offline Sameer Nikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 51
  • Gender: Male
  • Sameer Nikam
तू दिलेस वचन मला...
« on: September 28, 2012, 02:40:47 PM »
तू दिलेस वचन मला

उगवत्या नव्या सूर्याला
मी रोजच पाहत आहे
ज्या वळणावर साथ आपली सुटली
तिथे कधीची मी तुझी वाट पाहत आहे
 
तू दिलेस वचन मला
येशील तू इथे पुन्हा
मी मात्र आहे इथेच
यात आहे का माझा काही गुन्हा
 
आपली निसर्गाने देखील
ती वाट सजवली
पहावया आपुले मिलनाचे दृश्य
साऱ्यांची नजर आतुरलेली
 
सायंकाळच्या मंदावत्या सूर्यप्रकाशात
शोधे सारे वाट परतीचा
मी मात्र एकटाच येथे रेंगाळत
नाही मजला साथ तुझ्याविना कुणाचा
 
नाही करू शकलो माफ
आजही मी स्वतःला
ब्रम्हात वेड्या पडून
उगाच तुला मी दिले जायायाला
 
दिलेस वचन तू आपल्या प्रेमाची
येशील तू लवकर परतुनी
मनात फुटती अंकुर सवंशयाची
गेलीस खोटे वचन तू  देवूनी  

कृपया कविता वाचल्यावर आपल्या प्रतिकिया द्याव्या कारण मी या क्षेत्रात नवीन आहे धन्यवाद
समीर स निकम
« Last Edit: September 28, 2012, 02:43:31 PM by Sameer Nikam »

Marathi Kavita : मराठी कविता