Author Topic: वणवा आठवणींचा  (Read 2007 times)

Offline Er shailesh shael

 • Jr. Member
 • **
 • Posts: 77
 • Gender: Male
वणवा आठवणींचा
« on: October 04, 2012, 07:27:14 PM »
तिच्या वाटेवर खिळलेल्या नजरेस
एक पोरका नभ खुणावतोय ...
पेटलाय आता पाउस अन विझलय उन
वणवा आठवणींचा अजूनही धुमसतोय ....
मळभ दाटून आला कि
रंग सावळा होतो मनाचा ..
धूसर होतात चांदण्या तुझ्याविना
चंद्रही नसतो कुणाचा ...
कळत नाहीये दिशांचा पसारा कसा आवरावा
गेलेला तोल मनाचा कसा सावरावा ..
नकाशा घेऊन हाती तुझ्या मनाचा शोध घेतोय
पण प्रत्येक वाटेच्या शेवटी
त्याच वाटेच्या सुरुवातीस येऊन उभा राहतोय ...
वाट चुकलेल्या लहान मुलासारखा
डोळ्यात पाणी आणून तुला हाक मारतोय ....
अजूनही वाटतंय मनाला कि तू येशील
हात धरून माझा मला तुझ्या जगात नेशील ....
तुझ्या जगात नेशील .......
                                                            ---by Shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: वणवा आठवणींचा
« Reply #1 on: October 05, 2012, 11:46:04 AM »
chan kavita

Offline Er shailesh shael

 • Jr. Member
 • **
 • Posts: 77
 • Gender: Male
Re: वणवा आठवणींचा
« Reply #2 on: October 05, 2012, 07:52:28 PM »
thnx...

Offline avi10051996

 • Newbie
 • *
 • Posts: 27
 • Gender: Male
Re: वणवा आठवणींचा
« Reply #3 on: October 05, 2012, 10:22:27 PM »
..........अजूनही वाटतंय मनाला कि तू येशील
हात धरून माझा मला तुझ्या जगात नेशील ....
..............सुंदर ...अप्रतिम

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: वणवा आठवणींचा
« Reply #4 on: October 11, 2012, 01:23:52 PM »
वाट चुकलेल्या लहान मुलासारखा
डोळ्यात पाणी आणून तुला हाक मारतोय ....   khup sundar lines aahe !! :)

Offline spandan123

 • Newbie
 • *
 • Posts: 6
Re: वणवा आठवणींचा
« Reply #5 on: October 15, 2012, 04:38:35 PM »
Khup chan dear