Author Topic:  तुला  सोडून  जातांना    (Read 1325 times)

Offline spandan123

  • Newbie
  • *
  • Posts: 6
 तुला  सोडून  जातांना  
« on: October 10, 2012, 05:46:14 PM »
 >:(
निरस  जीवन  जगतांना 
नशिबही  थांबले  असतांना 
ह्या  विश्वात  एकटे  फिरतांना 
भेटलीस  तू  माझ्या  शब्दांना 
जीवनातल्या  अनुभवांना 
आसवांच्या  थेंबांना 
ओथांबलेल्या भावनांना
      म्हणूनच   
दाटून  येईल  कंठ  तुला  सोडून  जातांना 
भेटलीस  तू  माझी  नसतांना 
नसलीस  तू  माझी  तरी  हवी  हवीशी   वाटतांना 
दाटून  येईल  कंठ   तुला  सोडून  जातांना 
विसरून  जातो  विश्व  तुला  पाहतांना 
दुख:  होते  पाहून  तुला  दुसर्या  बरोबर  हसतांना 
दाटून  येईल  कंठ  तुला  सोडून  जातांना   
आनंद  होतो  तू  माझी  आहेस हे सांगतांना 
वाट  मोकळी  करतो  अश्रूंना  हे  सांगत  असतांना 
दाटून  येईल  कंठ  तुला  सोडून  जातांना   
विसरू  नकोस  एवढेच सांगतो जातांना 
तू  माझी  नाहीस  हे  सुद्धा  माहित  असतांना   
दाटून  येईल  कंठ  तुला  सोडून  जातांना 
दाटून  येईल  कंठ  तुला  सोडून  जातांना   
? ? ? ? 
Sandeep Gojare
« Last Edit: October 10, 2012, 05:53:13 PM by spandan123 »

Marathi Kavita : मराठी कविता