Author Topic: श्रद्धांजली तुला मी वाहितो  (Read 824 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
 गहिंवरतो सारखा हा जीव माझा
आठवुनि सहवास मज लाभला तुझा ।
बसे अंधारी जीव हा एकला विचारांत
आठवी ती साथ  दिली तूं जीवनांत ।
म्हणशी संसारी  एकत्र सदा राहूं
एक दुसर्या सोडून  न कधीं जाउं ।
त्याच आशेवर आपण  जगलों जीवनांत
मोद झाला एक-दोघांस सुखविण्यांत ।
परि दैवाने साधला कसा अघोरी डाव
अचानक माझा उचलून नेला जीव ।
जीव भावाची सखी सोडून कशी गेली
जीवन साथीची जरी आण तिने घेतलेली ।
आता जीवनाला उरलाय काय अर्थ
तुझ्या वांचुन वाटते तेंच सर्व व्यर्थ ।
म्हणुनि आजि मी तुला आठवितो
अन् प्रेम भावे श्रद्धांजली तुला मी वाहितो  ।।     

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_25.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mandar Bapat

  • Jr. Member
  • **
  • Posts: 263
  • Gender: Male
chan mstch...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):