Author Topic: तुझ्या स्वप्नातला  (Read 749 times)

तुझ्या स्वप्नातला
« on: October 29, 2012, 12:59:47 PM »
दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं..
                    कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो ,
डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं ..
                    कि मला तुझी आठवण येत नाही ,
गर्दीत असतो नेहमी याचा अर्थ असा नाहीये गं ..
                    कि मी मानल तुझा आयुष्यातून जाणं,
येणाऱ्या-जाणार्याशी हसतो याचा अर्थ असा नाहीये गं..
                    कि मला विरह नाही तुझ्या नसण्याचा ,
दिवस ढकलत निघालोय याचा अर्थ असा नाहीये गं.
                    कि मला जगण्याची इच्छा आहे
प्रेम नाहीये म्हणतोय याचा अर्थ असा नाहीये गं...
                    कि मी तुझ्यावर प्रेम करायचं विसरलोय
सगळ आहे तसाच आहे याचा अर्थ असा आहे ..
                   कि मी अजूनही त्याच वळणावर आहे,
                   मी अजूनही खूप प्रेम करतो तुझ्यावर ,
                   मी अजूनही तुझ्या आठवणीत रात्र रात्र जगतो,
                   मी अजूनही तुझी वाट पाहत आहे.
मी अजूनही तसाच आहे ....तुला हवा तसा....तुझ्या स्वप्नातला ...फक्त स्वप्नातला ... :)

Marathi Kavita : मराठी कविता