Author Topic: येईल का ग माझी आठवण .....?  (Read 2762 times)

Offline Er shailesh shael

 • Jr. Member
 • **
 • Posts: 77
 • Gender: Male
येईल का ग माझी आठवण .....?
« on: November 02, 2012, 04:07:33 PM »
येईल का ग माझी आठवण ...?
पावसाचे थेंब ओंजळीत झेलून घेशील
पण तुझ्या ओंजळीखाली माझी ओंजळ नसेल
पाउस सरसर बरसून ओलाचिंब करेल तुला
पण त्यात माझ्या स्पर्शाचा ओलावा कुठेच नसेल ..
तेव्हा येईल का ग माझी आठवण .....?
रात्रभर जागून चांदण्या मोजत बसशील
पण तुझा हा चंद्र त्यात कुठेच नसेन...
डोळ्यांमध्ये स्वप्न असतील खरी
पण ती स्वप्न पूर्ण करायला मी नसेन ...
तेव्हा येईल का ग माझी आठवण .....?
आपण भेटायचो त्या जागी येऊन मला शोधत राहशील
पण तिथे तुझ्याआधी येऊन तुझी वाट बघणारा मी नसेन ...
संध्याकाळचा अल्लड वारा तुझ्या गालावरचे केस बाजूला करेन
पण त्या वा-यामध्ये माझी चाहूल मात्र कुठेच नसेल ....
तेव्हा येईल का ग माझी आठवण .....?
किना-या मधल्या वाळूत माझे नाव लिहून जाशील
पण त्याशेजारी तुझे नाव लिहायला मी नसेन...
हातांच्या मुठीतून वाळू निसटून जात असेल तेव्हा
पण ती वाळू सावरायला मी नसेन ....
तेव्हा येईल का ग माझी आठवण .....?
                                     Shailesh Shael...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: येईल का ग माझी आठवण .....?
« Reply #1 on: November 05, 2012, 12:48:58 PM »
chan kavita

Dayanand

 • Guest
Re: येईल का ग माझी आठवण .....?
« Reply #2 on: June 29, 2013, 08:28:25 AM »
Khupch mast re

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: येईल का ग माझी आठवण .....?
« Reply #3 on: June 29, 2013, 09:56:09 AM »
छान कविता आहे ….  :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: येईल का ग माझी आठवण .....?
« Reply #4 on: July 01, 2013, 04:38:13 PM »
अप्रतिम कविता !

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: येईल का ग माझी आठवण .....?
« Reply #5 on: July 01, 2013, 06:58:27 PM »
शैलेश ही तुझी कविता आहे काय? कारण फेसबुक वर मला याची COPY PASTE दिसली. मी त्या पेजची LINK येथे देतोय, MK वरच्या बय्राच कविता तेथे आढळल्या. BY THE WAY NICE POEM....
.
.
.
""जगाच्या दूर , एका प्रेम नगरीत , आपल छोटस एक घर असाव ""
44,017 likes · 8,725 talking about this
Book
फक्त तु हवी होतीस...............♥♥♥
Like
Message
About· Photos

Offline Pratej10

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Female
Re: येईल का ग माझी आठवण .....?
« Reply #6 on: July 08, 2013, 07:29:39 PM »
sundar