Author Topic: तुझा ‘वेडा’  (Read 2101 times)

Offline किरण पवार

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
  • http://kiranpawar0108.wordpress.com/
तुझा ‘वेडा’
« on: November 09, 2012, 12:03:42 AM »

माझा अबोला
अन तुझा हा राग
कसे टिकणार आपले नाते
सखे मला सांग
तू ही माझावर तितकंच प्रेम केले असशील
मी नाही म्हणत नाही..
असतो आतासा मी गप्प गप्प
मी काही म्हणत नाही
पण तुला त्याचे काय पडलंय
तुझं मन आता दुसऱ्या कुणावर तरी जडलंय
जगेन मी एकटा
तुझा अगोदर ही एकटाच जगत होतो
‘वेड्या’ सारखा देवाकडे
तुलाच रोज मागत होतो
माझा वेड्या मनाचा शाप
आता तुला लागणार नाही
कारण आता रोज उठून
देवाकडे तुला मागणार नाही
राहून राहून मरताना मात्र
तुझाच नावाचे हुंदके येतील
तू एकदा तरी माझासाठी परत येशील
याच खोट्या आशेवर या ‘वेडयाचे’ प्राण जातील..

-किरण पवार

http://kiranpawar0108.wordpress.com/

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझा ‘वेडा’
« Reply #1 on: November 12, 2012, 03:55:26 PM »
hmhmhm :(

Offline किरण पवार

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
  • http://kiranpawar0108.wordpress.com/
Re: तुझा ‘वेडा’
« Reply #2 on: November 24, 2012, 12:14:29 PM »
 :)