Author Topic: जगणे जगायचे !!!  (Read 2813 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
जगणे जगायचे !!!
« on: September 09, 2014, 08:51:58 PM »
जगणे जगायचे !!!

आयुष्य आहे, खुशीत जगायचे
रडत आलो, हसत जायचे
दिवस येतीलही, जातिलही
रात्री सुखात झोपायचे
दू:ख येइलही, सुख ही येईल
परी नाही डगमगायचे
काटें असतील चालताना
चूकवित काटें चालायचे
कधी हार कधी जीत
स्वागत त्याचे करायचे!
स्वप्ने ऊद्याची पहायची
स्वप्नात रंगून जायचे
कधी ऊन कधी पाऊस
पावसात चिंब भिजायाचे
जीवन मात्र जगायचे
कधी हसत कधी रडत
जगणे जगत रहायचे

श्री. प्रकाश साळवी
दि.09-09-2014

Marathi Kavita : मराठी कविता