Author Topic: ऊपयोग काय त्याचा. ..!!!  (Read 1249 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
ऊपयोग काय त्याचा. ..!!!
« on: February 22, 2015, 09:50:33 PM »
ऊपयोग काय त्याचा....!
गाळाल आसवे जी मजसाठी तुम्ही
ऊपयोग काय त्याचा तेंव्हा नसेन या जगी मी
घेऊन याल हार फुलांचे दूःखी मनाने
ऊपयोग काय त्याचा परी नसेन या जिवाने
मागाल आयुष्य भले तूम्ही आता
ऊपयोग काय त्याचा सरणावर जाता
"मिळो सद् गती" माझ्याच पार्थिवाला
ऊपयोग काय त्याचा माझ्या या जिवाला
भले माफ केले आता जरी तुम्ही मला
ऊपयोग काय त्याचा वाया जन्म गेला
काय वाटते तूम्हांस माझ्या भल्याचे
आताच करा ना हो समजेन सार्थक जिवनाचे
श्री. प्रकाश साळवी
20-02-2015.

Marathi Kavita : मराठी कविता