Author Topic: मुंबई माऊली……माझ्या मायेची सावली….!!!  (Read 1192 times)

Offline Satish Choudhari

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
  • Gender: Male
  • Satish Choudhari
    • Mazya Kavita
कल्याण डोंबिवली
दादर भांडुप
मुलूंड कांदिवली…
कोळ्यांची राही मच्छी जिथं
तिथं हि फळफळली….
मुंबई माऊली……
माझ्या मायेची सावली….

धावता धावता दम लागे
बस आणि लोकलच्यामागे
वेळेलाही मागे टाकूनी
मुंबापूरी हि जिंकून आली
मुलींची आहे गर्दी इथं….
मुलांची हि बोंबावली
मुंबई माऊली……
माझ्या मायेची सावली….

कितिही संकटं झेलून गेली
कधिही ना ही थांबली
चंद्रताऱयांची वरात इथे
बेमौसमी बरसात इथे
कधी होळी-रंगपंचमी
कधी गोऴ्यांची भयानक रात इथे..
तरीही कधी ना ही भ्यायली…
मुंबई माऊली……
माझ्या मायेची सावली….

--- सतिश चौधरी