ॐ साई
अध्यात्मिकता
जी असाध्य गोष्ट सहज साध्य होते,
ती यश प्राप्ती,म्हणजे प्रसन्नता,
जी प्रसन्नता पुढची पायरी चढवते,
ती आसक्ती,म्हणजे उत्सुकता,
जी उत्सुकता प्रयत्नशील बनवते,
ती कार्याबद्दलची आत्मीयता,
जी आत्मीयता ध्येयाची ओढ लावते,
ती ओढ म्हणजे एकाग्रता,
जी एकाग्रता कार्यात लीन करते,
ती स्तिथी, म्हणजे एकरूपता,
जी एकरूपता,प्रपंची राहून एकट ठेवते,
ती भावना,म्हणजे अलिप्तता,
जी अलिप्तता,षड्रीपुंना हद्दीत ठेवते,
ती म्हणजे वैचारिक स्थिरता,
जी स्थिरता पंचत्वा कडे नजर फिरवते,
ती नजर,अर्थात शून्यता,
जी शून्यता ओंकाराकडे केंद्रित करते,
ती साधना म्हणजे विलीनता,
जी विलीनता परमार्थाची ओढ लावते,
ती ओढ म्हणजेच,अध्यात्मिकता....!!!
चारुदत्त अघोर.(दि.३१/८/१०)