Author Topic: तुझ्या रक्तामधला मज छावा पाहिजे..!!!  (Read 3005 times)

Offline ankush patil

  • Newbie
  • *
  • Posts: 9
ना गर्दी..
ना दर्दी..
ना बुनग्यांचा थवा पाहिजे,
फक्त तुझ्या रक्तामधला मज छावा पाहिजे||
ना दारू..
ना गुटखा..
ना मावा पाहिजे ,
फक्त तुझ्या रक्तामधला मज छावा पाहिजे||
ना हत्ती..
ना वाघ..
ना रानटी गवा पाहिजे,
फक्त तुझ्या रक्तामधला मज छावा पाहिजे||
ना अन्न..
ना वस्त्र..
ना हवा पाहिजे,
फक्त आणि फक्त  तुझ्या  रक्तामधला मज छावा पाहिजे||
>कवी-अंकुश पाटील(निरांकुश)
 खास आजच्या दिवसात सुचलेलं नवं  काव्य  माझ्या  शंभूराजांना   अर्पण..!!