Author Topic: जेव्हा देवचं देवाला जन्म देतो!!(ही कविता सचिन तेंडुलकरसाठी लिहिली आहे)  (Read 2413 times)

Offline प्रसाद

  • Newbie
  • *
  • Posts: 3
जेव्हा देवचं देवाला जन्म देतो,
शतकांच्या शतकांचा विक्रमही त्याच्या डाव्या हाताचा खेळ असतो,
वैयक्तिक २००* ही सोपा वाटायला लागतो,
जेव्हा देवचं देवाला जन्म  देतो!!
 
 अख्तर,ब्रेट ली हा त्या शिकारयाचा जणू सावजचं असतो,
 ९५ अर्धशतकांचा पर्वत तर तो सह्ज पार करतो,
जेव्हा देवचं देवाला जन्म देतो!!
 
 जग्गजेत्या ऑस्ट्रेलियालाही एका तपानंतर विश्वचषकातून बाहेर घालवता येतं,
डार्क हॉर्स पाकिस्तानलाही आपण पाणी पाजतो,
जेव्हा देवचं देवाला जन्म देतो!!
 
अंतिम सामन्यात जरी फक्त १८ धावा करतो,
पण शेवटी देव तर देवचं असतो!!
 
 
जेव्हा हाच देव आपल्या संघसहकारयांना आत्मविश्वास देतो,
तेव्हा विश्वचषकही आपलाच होतो,
आणि आपणही आनंदाश्रू आवरेनासे होतो,
जेव्हा देवचं देवाला जन्म देतो!!!!
                      -प्रसाद वाजे