Author Topic: “त्यांनी दिलेलं जीवन एकदा…!!” चारुदत्त अघोर (२४/३/११)  (Read 2314 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ओम साई
“त्यांनी दिलेलं जीवन एकदा…!!” चारुदत्त अघोर (२४/३/११)

रोज पडत्या स्वप्ना पलीकडे,डोकावून पहायचं आहे,
कधीच न पाहिलेल्या गावी,एकदा जाऊन बघायचं आहे;
पानगळीत झाडाला,हिरव्या आशेनं हाताळायचं आहे,
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!

वाळवंटातही तळ,साचवून पहायचं आहे,
उन्हाळ्यातही,एकदा गारठवून बघायचं आहे;
पावसाळी पडत्या थेंबी,मन ओलावून टाकायचं आहे,
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!

लेखन वळवता न येणाऱ्या हातानी,चित्र रेखाटायचं आहे,
यमक न जुळणाऱ्या शब्दांनी,काव्य रचायचं आहे;
स्वर अज्ञाती,एकदा गाणं गायचं आहे;
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!

अशिक्षित अभ्यासी,परिक्षी बसायचं आहे,
शून्य न समजलेल्या स्मरणी,शम्भारानी गुणायचं आहे;
कधीच न वाचल्या नाटकास,दिग्दर्श्वून बघायचं आहे,
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!

सरळ रुक्ष केशी,प्रेम कुरळून बघायचं आहे,
अरसिक अंगी,शृंगारी शहारायाचं आहे;
अ-समवेदनीत,शारिरी चेतावायाचं आहे,
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!

कायम तळी असल्या स्वतःस,सागरी पोहायचं आहे,
दूर दूर पठारीत जीवनास,शिखरी उंचावायचं आहे;
दलदलीत आयुष्य मातीस,कधी वाळवंटायाचं आहे,
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!

कर्म-कठोरीत वृत्तीस,हळवाऊन पहायचं आहे,
कोरड्या पापणीत डोळ्यांना,अश्रवून बघायचं आहे;
एकटेपणाला एकदा,सखावून पहायचं आहे,
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!

खुर्चीत विसावत्या डोक्याला,एकदा मांडावयाचं आहे,
बेवारस श्वासाला,कधी पदरीत उबवायचं आहे;
खपलीत ओठांना एकदा,ओठावून ओलावायाचं आहे,
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!

सुन्या हाती कुणाला,लोभावून बघायचं आहे,
विशाल छाती कुणाला,डोकावून पाहायचं आहे;
एकल्या रजनीस दुजावून,चंद्री रात्रायचं आहे,
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!

काटेरी जीवनाला कधी,पिसावून बघायचं आहे,
थकल्या देही सख्या खांदी,विसावून पहायचं आहे;
कायम जागृत असल्या नेत्रास,शांत झोपायचं आहे,
त्यांनी दिलेलं जीवन,एकदा जगून बघायचं आहे...!
चारुदत्त अघोर (२४/३/११)

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):