Author Topic: आयुष्य असावं तर, नाजुक फुलासारखं...!!  (Read 3989 times)

आयुष्य असावं तर,
नाजुक फुलासारखं.....

मुरगळल्या नंतर ही,
सुगंध मागे ठेवणारं.....

कधी खुदकन हसणारं,
कधी अपुकसक रडणारं.....

कधी गोड लाजणारं,
कधी नकळत रुसणारं.....

पण ???

मरताना ही दुस-याला,
दुःखातही सुख देणारं.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १४-१०-२०१३...
सकाळी ०७,२७...
© सुरेश सोनावणे.....