Author Topic: आठव जरा गं नारी!  (Read 1774 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
आठव जरा गं नारी!
« on: March 08, 2013, 03:34:45 PM »
 नको करूस सहन आता
सीता बनून
नको बोलावूस रामाला
सेना घेऊन

दे लाऊन आग लंकेला
हनुमान यायच्या आधी
पेटवून ठिणगी आत्मसन्मानाची
प्रत्येकीच्या रीदया मधली

होईल तेंव्हाच वध ,  दशमुखी रावणाचा
राम यायच्या आधी
भडकून उठेल जेंव्हा क्रोध स्त्रियांचा 
राम यायच्या आधी

नको करूस सहन आता
द्रौपदी बनून
नको बोलावूस कृष्णाला आता
साडी घेऊन

कर जागं स्त्रीयांना
कृष्ण यायच्या आधी
त्याच बनतील साडी तुझी
कधी न फेडता येईल अशी

होईल तेंव्हाच वध दुर्योधनाचा
पांडव यायच्या आधी
भडकून उठेल जेंव्हा क्रोध स्त्रियांचा
पांडव यायच्या आधी

तूच केला होतास वध, महिशासुराचा
महिषासुर मर्दिनी बनून
तूच केले होतेस भस्म, भस्मासुराला
नर्तकी बनून

तूच केलं होतं युध्द इंग्रजांशी
झाशीची राणी बनून
तूच केलं होतस अणु परीक्षण
इंदिरा गांधी बनून

तूच केलीयस सेवा पिडीतांची
मदर टेरेसा बनून
तूच गेली होतीस आकाशात
स्मिता विल्यम्स बनून

उडवतेस तू विमान कधी,
चालवतेस तू ट्रेनही
आहेस कधी तू ट्याक्सी ड्रायव्हर
कधी तूच कंडक्टरही 

तू सी इ ओ आहेस, मिनिस्टर आहेस
तू आहेस पोलिस ऑफिसर
सैनिक बनून तू सीमेवर
करतेयस देशाचे रक्षण

कोणतही क्षेत्र न सोडलयस तू
काहीही ना अशक्य आता तुला
प्रत्येक क्षेत्रात चामकतेयस  तू
पूर्वेचा उगवता सूर्य जसा

आठव तुझ्या ह्या रुपांना
गरज नाही तुला कुणाच्या मदतीची
प्रत्येक रूपांनी तुझ्या, दाखवलाय जगाला
अबला नाही सबला आहे नारी


केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: आठव जरा गं नारी!
« Reply #1 on: March 09, 2013, 03:36:13 PM »
मस्त! केदार दादा, तुझे विचार खरच उच्च दर्जाचे आहेत. खूपच मस्त...... :)