Author Topic: देवा! तुझ्या दरबारी...  (Read 736 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
देवा! तुझ्या दरबारी...
« on: October 12, 2015, 11:27:37 AM »
देवा ! तुझ्या दरबारी...

या कलयुगी अजून
होणार आहे तरी काय?
देवा तुझ्या दरबारी तरी
मिळेल ना रे न्याय ?

खोटे खोटे बोले त्याला,
मिळे पोटभर अन्न,
खरे खरे बोले त्याला,
होई मुश्किल जगण-मरण
          देवा तुझ्या दरबारी
          हाच का रे न्याय? == १ ==
कामकरी कष्टकरी
कष्टाने रे मरती
कर्जाच्या बोझ्याने रे
शेतकरी उगिच मरती
     मधले दुर्जन दलाल
     खाती दुधावरची साय == २ ==
सती साध्वी करी
पातिव्रत्य सेवा,
बाजार बसव्यांना,
मिळे पोटभर मेवा,
       नारी जन्मा तुझी,
       हीच कथा काय ? == ३==
कलियुगी होते
खोट्याचीच जीत,
भ्रष्टाचार चाले जिथे ,
शिष्टाचाराची रीत,
         देवा तुझा अवतार
         कधी होणाराय ? == ३ ==

श्री. प्रकाश साळवी.prakashsalvi1.blogspot.in

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 146
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
Re: देवा! तुझ्या दरबारी...
« Reply #1 on: November 02, 2015, 01:33:29 PM »
nice...