परत तो त्याच फाटक्या सद्त्र्यात मला दिसला
पाहून मला ओळखल्या सारखंच हसला
न राहवून त्याला विचारले उत्तर ऐकून ते दिवस आठवले
नुकत्याच जबाब दार्या अंगावर घेतलेल्या
नोकरी साठी चपला झीजवलेल्या
खिशात जेमतेम दहा रुपये
उनातानात भटकलेला
असंच एका नोकरीची मुलाखत झाली
कळवतो म्हणाले , तुमची प्रामाणिकता पसंद आली
उत्तर अजून मिळाले नव्हते
त्रास अजून संपले नव्हते
वणवण भटकून पोटात कावळ्यांची किलकिल
सुरु झाली
घातला खिशात हात ती दहा रुपयांची
नोट हातात आली
पाच रुपयांचे तिकीट कादुया
पाच रुपयांचे काहीतरी खाऊया
लोकल ची वाट बघू लागलो
स्टेशन वर काही खायला दिसतंय ते पाहू लागलो
पाच रुपयांचा वडा पाव घेतला
तितक्यात हा पोरगा जवळ आला
तेव्हाही फटका सदरा
मळकट अंग , मात्र हसरा चेहरा
माझ्या जवळ येऊन म्हणाला
दादा, " भूक लागलीय "
आतडं माझं पण जळत होतं
पण त्याला कुठे कळत होतं
चिमुरडा तो असहाय होता
आशेन बघत होता
घे, खा, ... हा वडा पाव"
माझे पोट भरले
हात जोडले त्याने असं पहिले कि
माझे डोळे भरले
धावत गेला तो त्याच्या छोट्या बहिणी कडे
असेल दोन तीन वर्षांची
मळकट अंगाची हिरव्या डोळ्यांची
त्याने वडा पाव तिला दिला
स्वतः मात्र उपाशीच राहिला
हसत माझ्या कडे परत पाहिले
कायमचा स्मरणात राहिला
घरी आलो ,
थकलेला,चिंता उद्याची
अन अचानक बेल वाजली फोनची
तुमची निवड झाली आहे अस उत्तर ऐकू आलं
काय बोलू मला माझं आभाळ ठेंगणे झालं
क्षणात तो पोरगा डोळ्यासमोर आला
त्याचाच आशीर्वाद जणू
मला नोकरी देऊन गेला
मग रोज त्याला शोधण्याचा
प्रयत्न केला
कुठे गेला , दिसेनासा झाला
आज चार वर्षांनी तो मला दिसला
अन तसाच पूर्वी सारखा हसला
त्याला विचारलं शाळा शिकणार
म्हणाला बहिणीला टाकलंय शाळेत
आता मी काम करणार
आज त्याने एक पैसा नाही घेतला
खेळण्याची पिशवी दाखवून म्हणाला
दादा, खेळणी घेणार काय ?
काय दैवाचा खेळ कुणाला कधी
समजला काय ?
मैत्रेय (अमोल कांबळे)