Thank to all for great responce for paus ani ti, and kunitari haravalay. some friends were upset by remembering sumone. so this one for them
मी खिडकी जवळ बसुन पाऊस
ऐकत होतो, त्याचं एकसंथ पडणं
ऊगाच निरखत होतो,
पाऊस हसवतो, पाऊस रडवतो,
असं का होतं, ऊत्तर शोधत होतो!
पाऊस कोसळत होता,
मन मोकळं करत होता,
प्रत्येक थेंबाच आस्तित्व असतं
जणू कळवळून सांगत होता
त्यानेच शिकवलं हसणं रडणं,
दुसर्यांसाठी आपलं जगणं,
आपण येतो, जाण्यासाठी,
गेल्यावर आठवणीत
राहण्यासाठी!
मैत्रेय(अमोल कांबळे )