आज माझी आजीचे डोळे पाणावले होते, जुन्या आठवणींने!
किती सोसलय नारीने तिच्या ऊभ्या आयुष्यात! नारी जातीला समर्पित हि छोटीशी रचना!
नात्याचं जन्म तिच्या उदरातुन व्हावा
जन्म मरणाच्या फेर्यात स्त्रिजन्म घ्यावा
कळेल मग वेदना तिच्या आस्तित्वाचि
खर्या शक्तिचा सुर्योदय व्हावा
सहनशीलतेचा आस्वाद घेण्या,
जन्म नव्या अंकुरास द्यावा!
मरण यातनांचं कडवट विष
रिचवुन आसमंत अमृतात नहावा!
ति माय, आक्का, पाठराखिण व्हावी
रुप विभिन्न प्राण एक व्हावा,
जन्माहुन थोर अवघा स्त्रिजन्म ऊभा,
जन्म मरणाच्या फेर्यात एक स्त्रिजन्म नशिबी यावा!
मैत्रेय(अमोल कांबळे)