Author Topic: $$$$ आई $$$$  (Read 1149 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$$$ आई $$$$
« on: July 29, 2015, 08:14:53 AM »
$$$$  आई  $$$$

आई म्हणजे एक प्रेमळ भावना
जिचा अंत सरता सरेना
आई म्हणजे मायेचा सागर
जिच्यात नाही कसलाही तिरस्कार

आई म्हणजे प्रेमळ जीवन
ज्यात नाही कसलीच उणीव
ठेच लागता अंगठ्याला
निघे तोंडून आई ग !
आई तुझ्या विना मी जीवनी 
अभागी आहे ग !

आई म्हणजे तारेवरची कसरत
म्हणूनच घरकामात तिला करावी लागते वेळेची कसरत
आई म्हणजे मार्गदर्शक
जिच्यामुळे होते जीवनाचे सार्थक

कुणी म्हणतो " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी "
मी म्हणतो "ज्याला आई आहे तो तिन्ही जगाचा स्वामी ".

                                   विजय वाठोरे सरसमकर
                                      9975593359

Marathi Kavita : मराठी कविता