Author Topic: $$$ माणुसकी $$  (Read 1342 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$$ माणुसकी $$
« on: July 12, 2015, 08:58:44 AM »
$$$ माणुसकी $$

अरे मानवा मानवा
कुठे आहे तुझी माणुसकी
का झालास तू आज
कथेतील लांडग्यावाणी

आज इथे घडतो अपघात
तरी तू त्यास करीना मदत
मानवास माणुसकी दावाया
आता येणार नाही कोणतही दैवत

भर दिवसा होती बलात्कार
का करत नाहीस त्यास प्रतिकार
राहशील तू असाच अजाण तर
होतील तुझे कुत्र्यागत बेहाल र

समाजास ताराया तूच तू
अरे मानवा थोड सत्कर्म करशील का रे तू ?
इथे कुणी ना कुणा जाणी
मला जीवन जगण्या थोडीशी हिम्मत देशील का रे तू ?

आता नकोच तुझी हि दुनियादारी
मानवा तुझी हि माणुसकी तुलाच प्यारी
आजवर पुरोगामिंचा हिनेच पाडीला मुडदा
पुन्हा पुन्हा तरी करू नकोस हि वारी 

                        विजय वाठोरे सरसमकर
                          ९९७५५९३३५९

Marathi Kavita : मराठी कविता