Author Topic: तू रं 'बाबा'...  (Read 1960 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
तू रं 'बाबा'...
« on: December 11, 2014, 11:12:12 AM »


तू रं 'बाबा'...

त्यागलं आप्त गोतानं
समाजानं दारी लोटलं,
घीऊन जल्माचं 'कोड'
नशीबान वाटं बशिवलं !

घेत्यात दरशान कुणी
मोजूनी मोल रोकडं,
जोडावया तूला देवा
हात आमुच तोकडं !

दिलास तू रं हात 'बाबा'
घेया जगाशी टक्कर ,
भोगायचं किती दिस?
लिवून जखमांची लक्तरं !


©शिवाजी सांगळ॓

Marathi Kavita : मराठी कविता