Author Topic: "निसर्ग"  (Read 2617 times)

Offline talktoravi

  • Newbie
  • *
  • Posts: 6
"निसर्ग"
« on: February 21, 2011, 09:02:57 AM »
असेच वाटे त्यास एकदा, दूर कुठेसे जावे
शहराचा विळखा सैल करावा, निसर्गा सवे गावे

घुसमटलेल्या रहदारीचा पाश सोडला मग त्याने
डोंगरमाथा, पाऊलवाटा, मोहविते पक्षांचे गाणे

अभ्र सभोती, गर्द झाडी, खळखळाट तो पाण्याचा
आगळाच आनंद मिळे, शिथिल संथ ह्या जगण्याचा...

रवी जोशी
२१ फेबरुवारी २०११

Marathi Kavita : मराठी कविता