Author Topic: "आयुष्य."  (Read 3865 times)

Offline charudutta_090

 • Jr. Member
 • **
 • Posts: 185
 • Gender: Male
 • A fall leaf of autumn,....!!
"आयुष्य."
« on: February 19, 2011, 11:38:46 AM »
ओम साई.
"आयुष्य."
जीवन हे प्रेम करायला आहे ,राग ठेवायला नाही,
सुखद क्षण हे वेचायला आहे,गमवायला नाही;
लोभ  हा पसरवायला आहे,आट्वायला नाही,
शब्द हे समजायला आहेत,पटवायला नाही;
इच्छा हि ठेवायला आहे,मोडायला नाही,
मैत्री हि जोडायला आहे तोडायला नाही;
गैर समज हे गैरच आहेत,जे जोपासायला नाही,
मैत्री ताप नसून उब आहे,जी तपासायला नाही;
कोवळं ओलं भावनिक रोपटं,लावायला आहे उपसायला नाही,
कविता सुरी, शब्द फोडायला आहे,हृदयी खुपसायला नाही;
मन-हृदय भिजली माती आहे,वाळवंट-रेती नाही,
सुंदर भावना पालवी-पिक आहे,पसरली शेती नाही;
जीव हा उमलती कळी आहे,पूर्ण बाग नाही,
चीड हि काटारुपी रुत आहे,मनात रुजता राग नाही;
शृंगार हा मखमली गालीचा आहे,बोचती चादर नाही,
ती प्रितीच काय जिला मोहित मदनाचा आदर नाही;
आयुष्य हे खोल प्रगल्भित ज्ञान आहे,क्षणिक अविचार नाही,
ते सुविचारीत पुष्पं-गुच्छ आहे,ज्यात सुकले कुविचार नाही...!
चारुदत्त अघोर.(ता.१९/२/११)Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: "आयुष्य."
« Reply #1 on: February 24, 2011, 11:32:33 AM »
chhan ahe