नववर्षारंभाची सुरवात करत
विक्रम सवंस्तर कालगणना सुरू होते
साडेतीन मुहूर्तापैकी एक
उत्तम दीनाचे याला महत्व आहे
कार्तीक शुद्ध प्रतिपदेला
बालप्रतिपदा सण साजरा होतो
चारीत्र्यवान, प्रजाहितरक्षक राजा
लोककल्याणकारी दानशुर राजा
बळीराजाचा हा दिवस आहे
इडा पिडा जावू दे
बळीचं राज्य येवू दे
ही म्हण प्रचलीत आहे
सुवासिनींकडून पतीला औक्षण
या दिवसाचं खास वैशिष्ट्य आहे
दिर्घायुष्य दोघांना मिळो म्हणुन
ओवाळणी देण्याची पद्धत आहे.
उमेश