इतर कविता
(क्रमांक-37)
-------------
मित्र/मैत्रिणींनो,
"इतर कविता" अंतर्गत मी इतर कवींच्या कविता आपणापुढे सादर करीत आहे .
तु फ़क्त हो म्हण…
---------------
तुला मी स्वप्न देतो,
स्वप्नांना पंख देतो,
पंखाना बळ देतो….
तु फ़क्त हो म्हण…
तुला हवी ती चांदणी देतो…
तुझ्या चांदणीचा चंद्र होतो…
सारे डाग स्वतःवर घेतो….
तु फ़क्त हो म्हण….
तुला साती रंग देतो…
तुझ्या हाती इंद्रधनू देतो…
सारे रंग मिळूनही मी मात्र सफ़ेद रहातो…
तु फ़क्त हो म्हण…
खर सांगायचं तर काय हवं ते दे देतो…
तुझ्याकडच तुलाच कसं देणार…
नाहितर म्हटलं असतं माझं काळीज देतो….
तु फ़क्त हो म्हण…
---अनामिक
-----------
संकलक- सुजित बालवडकर
-------------------------
(साभार आणि सौजन्य-मराठीकविता.वर्डप्रेस.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.11.2022-रविवार.