इतर कविता
(क्रमांक-88)
-------------
मित्र/मैत्रिणींनो,
"इतर कविता" अंतर्गत मी इतर कवींच्या कविता आपणापुढे सादर करीत आहे .
एवढच ना…
-----------
एवढच ना ,एकटे जगु
एवढच ना…..
आमच हस ,आमच रड
ठेवुन समोर एकटेच जगु
एवढच ना…..
रात्रीला कोण ,दुपारला कोण
जन्माला अवघ्या ,या पुरलय कोण्
श्वासाला श्वास् क्षणाला क्षण
दिवसाला दिवस जोडत जगु
एवढच ना…..
आंगणाला कुंपण् , होतच कधी
घराला आंगण् ,होतच कधी
घराचे भास अंगणाचे भास
कुंपनाचे भासच भोगत् जगु
एवढच ना…..
आलात तर आलात, तुमचेच पाय
गेलात तर गेलात ,कुणाला काय
स्वताच पाय स्वताच वाट्
स्वताच सोबत होउन् जगु
एवढच ना…..
मातीच घर ,मातीच दार
मातीच्या देहाला, मातीचे वार
मातीच खरी मातीच बरी
मातीत माती मिसळत जगु
एवढच ना….
– संदीप खरे-(मौनाची भाषांतरे)
----------------------------
--संकलक-सुजित बालवडकर
--------------------------
(साभार आणि सौजन्य-मराठीकविता.वर्डप्रेस.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.12.2022-मंगळवार.